MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत गट ब व क पदांच्या एकुण 8,169 जागांसाठी महाभरती प्रक्रिया 2023

Spread the love

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत गट ब व गट क संवर्गातील पदांच्या तब्बल 8,169 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Public Service Commission Recruitment for Group B & C , Total Number of vacancy – 8,169 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नाव – सहाय्यक कक्ष अधिकारी , राज्य कर निरीक्षक , पोलिस उपनिरिक्षक , दुय्यम निबंधक , दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क , तांत्रिक सहाय्यक , कर सहाय्यक , लिपिक टंकलेखक

एकुण पदांची संख्या – 8,169

पात्रता – वरील नमुद सर्व पदांकरीता पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे यापैकी कर सहाय्यक व लिपिक टंकलेखक पदांकरीता मराठी टंकलेखन 30 श .प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवाराचे वय दि.01 मे 2023 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.14 फेब्रुवारी 2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदांकरीता खुला प्रवर्गातील उमेदवारांना 394/- रुपये तर मागासवर्गीय / अनाथ प्रवर्गातील उमेदवारांकरीता 294/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment