मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद या आस्थापनेवर स्वयंपाकी पदाकरिता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहित कालावधी मध्ये ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .पदाचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे पाहूयात .
यामध्ये स्वयंपाकी या पदासाठी पात्र उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येतात असून , सदर पदाकरिता उमेदवार हा किमान चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवार जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेला 18 वर्षापेक्षा लहान व 38 वर्षापेक्षा मोठा नसावा .यामध्ये मागासवर्गीय उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षाचे असेल .
यामध्ये उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता ,बोलता येणे आवश्यक आहे . उमेदवारांना स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्यासंबंधीचे अनुभव असणे आवश्यक आहे , उमेदवारास सर्व प्रकारचे मांसाहारी खाद्यपदार्थ बनवता येणे आवश्यक आहे .
त्याचबरोबर उमेदवार हा फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेला नसावा , किंवा उमेदवाराच्या विरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित नसावा . त्याचबरोबर न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांच्यावर कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित नसणे आवश्यक आहे .
वेतनश्रेणी सदर निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार 16,600 /- ते 52, 400 /- रुपये या वेतनश्रेणीमध्ये वेतन अदा करण्यात येईल , यामध्ये इतर वेतन व भत्ते लागू करण्यात येईल .
- समता नागरी सहकारी पतसंस्था नगर येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुर अंतर्गत लिपिक , शिपाई पदांच्या 358 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत तब्बल 4039 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका .
- ONGC : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 2236 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 614 जागेसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका .