मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठ अंतर्गत शिपाई पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bombay high court nagapur recruitment for peon post , number of post vacancy – 45 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये शिपाई पदांच्या एकुण 45 रिक्त पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे किमान सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 17.02.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://bhc.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 04.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 50/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !