मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकूण 160 शिपाई व हमाल पदाकरिता पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , ऑनलाईन पद्धतीने शैक्षणिक पात्रताधारक उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये आवेदन (application ) मागविण्यात येत आहे .
सदर पदाकरिता उमेदवार हा इयत्ता सातवी (7 वि ) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल 38 वर्षे दरम्यान आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवार हा फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे , किंवा त्याच्या / तिच्याविरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित नसावा .
त्याचबरोबर उमेदवारास मराठी भाषा बोलता ,वाचता आणि लिहिता येणे आवश्यक आहे . ऑनलाइन अर्ज करताना जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक पात्रता व इतर बाबींची पूर्तता केली असेल तरच , अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाईल .
निवड प्रक्रिया : जाहिरातीमध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज या https://bhc.gov.in/bhcpeonrecruitment संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने दिनांक 07 एप्रिल 2023 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करिता अर्ज करताना 25/- रुपये शुल्क भरणे आवश्यक आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !
- मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांच्या 105+ रिक्त जागेसाठी महाभरती !
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !