राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये पदभरती प्रक्रिया संदर्भात , महाराष्ट्र राज्य उद्योग व ऊर्जा कामगार विभागाकडून दिनांक 14 मार्च 2023 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील सविस्तर पदभरती प्रक्रिया शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहूया ..
राज्य शासन सेवेमध्ये बाह्य यंत्रणे कडून कामे करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेचे एजन्सीची पॅनल नियुक्ती करण्यासंदर्भात शासनाने मान्यता दिलेली आहे . यानुसार राज्य शासन सेवेमध्ये एकूण 75 हजार जागेसाठी बाह्य यंत्रणेद्वारे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . यामध्ये प्रामुख्याने अति कुशल , कुशल अर्धकुशल व कुशल अशा वर्गवारीनुसार पदाची भरती राबविण्यात येणार आहे .
यामध्ये अतिकुशल कामगारांमध्ये प्रकल्प व्यवस्थापक , प्रकल्प सहाय्यक , वरिष्ठ इंजिनियर, कनिष्ठ अभियंता, लेखापाल, व्यवसाय तज्ञ, संशोधन सहाय्यक, विधी अधिकारी तसेच शिक्षक, अधीक्षक अशा पदांचा समावेश अति कुशल कामगारांमध्ये करण्यात आलेले आहे .
कुशल कर्मचारी यामध्ये सहाय्यक विधी अधिकारी ,सहाय्यक ग्रंथपाल , सहाय्यक शिक्षक ,खाते अधिकारी ,बँक सहाय्यक, कनिष्ठ लेखापाल ,ड्राफ्ट मॅन ,कनिष्ठ व्यवस्थापक ,कनिष्ठ लिपिक, व्यवस्थापक अशा पदांचा समावेश कुशल कामगारांमध्ये करण्यात आलेली आहे .
सेमी कुशल कर्मचाऱ्यांमध्ये कारपेंटर , माळी ,हाउसकीपिंग स्टाफ, लिफ्ट ऑपरेटर ,वरिष्ठ गार्नर ,भांडारपाल अशा पदांचा समावेश करण्यात आलेला आहे . तर अकुशल कर्मचाऱ्यांमध्ये परिचर, सफाईगार ,लेबर ,मेसेंजर, मदतनीस, शिपाई अशा पदांचा समावेश अकुशल कर्मचाऱ्यांमध्ये करण्यात आलेली आहे.
सदर पदांच्या तब्बल 75 हजार जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे , या संदर्भातील सविस्तर पदभरती शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा !
- युको बँकेत पदवीधारक उमेदवारांसाठी 250 रिक्त जागेवर पदभरती ; लगेच करा आवेदन !
- केंद्र सरकारच्या NALCO कंपनी अंतर्गत 518 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करण्यास मुदतवाढ !
- कृष्णा विश्व विद्यापीठ सातारा अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; अर्ज करायला विसरुन नका !
- राष्ट्रीय महासागर सुचना सेवा केंद्र अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; Apply Now !
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत तब्बल 400 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !