राज्य शासन सेवेमध्ये बाह्य यंत्रणे कडून कामे करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेचे / एजन्सीचे पॅनल नियुक्ती करण्यासाठी राज्य शासन मान्यता देण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे .
यानुसार राज्य शासन सेवेमध्ये संवर्ग क व ड मध्ये तब्बल 75,000 पदांसाठी पद भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . यासाठी बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार एजन्सी नवीन पॅनल नियुक्ती करण्यासाठी दिनांक 01.09.2019 च्या आदेशाने कामगार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली निविदा समिती गठीत करण्यात आलेली आहे . यानुसार अति कुशल ,कुशल ,अर्ध कुशल आणि अकुशल अशा चार प्रकारच्या मनुष्यबळाचा समावेश सदर निर्णयामध्ये करण्यात आलेली आहे .
यामध्ये प्रकल्प व्यवस्थापक ,वरिष्ठ अभियंता ,कनिष्ठ अभियंता, लेखापाल, समन्वयक ,कायदा अधिकारी, संशोधन अधिकारी, शिक्षक ,सुपरवायझर ,इंजिनीयर, इत्यादी पदांचा समावेश अतिकुशल प्रवर्गामध्ये करण्यात आला आहे .
तर कुशल कामगार प्रवर्गामध्ये खाते व्यवस्थापक, ग्रंथपाल ,सहाय्यक ग्रंथपाल ,सहाय्यक शिक्षक ,खाते अधिकारी, बँक अधिकारी, ड्राफ्ट मॅन, वरिष्ठ लिपिक ,अधीक्षक ,वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, कार्यालय सहाय्यक, स्टेनोग्राफर, भांडारपाल ,वाहन चालक इत्यादी पदांचा समावेश करण्यात आलेला आहे .
अर्ध कुशल प्रवर्गामध्ये केअरटेकर, माळी ,हाउसकीपिंग स्टाफ, भांडार सहाय्यक, लिफ्ट ऑपरेटर इत्यादी पदांचा समावेश करण्यात आलेला असून सदर पदाकरिता उमेदवार हा किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
तर अकुशल प्रवर्गामध्ये परिचर ,सफाईगार , लेबर ,मजदूर, मदतनीस ,सफाईगार, शिपाई इत्यादी पदांचा समावेश करण्यात आलेला आहे . सदर पदांकरिता शिक्षणाची कोणतीही अट असणार नाही . सदर पदांकरिता प्रतिमहा 25 हजार रुपये वेतन अदा करण्यात येणार आहे .
पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता व वेतनमान पाहण्यासाठी पद भरती बाबतचा सविस्तर शासन निर्णय खालील लिंक वर क्लिक करा .
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !