महाराष्ट्राच्या बालविकास विभागामध्ये अंगणवाडी सेविका , मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिस पदांसाठी पदभरती प्रक्रिया सुरु झालेली आहे .काही जिल्हा प्रशासनांकडून पदभरती प्रक्रिया बाबतची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .यामध्ये जिल्हा निहाय पदभरती प्रक्रिया जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
राज्यांमध्ये सध्या अंगणवाडी सेविका , मदतनिस , मिनी अंगणवाडी सेविका पदांच्या एकुण 20,186 जागांसाठी पदभरती तात्काळ करण्याचे आदेश राज्य शासनांकडून देण्यात आलेले आहेत .यामुळे सध्या तालुकानिहाय अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .
यामध्ये सध्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका , सोलापुर जिल्हातील सर्व गावातील रिक्त अंगणवाडी सेविका / मदतनिस पदांकरीता पदभरती प्रक्रिया बाबतची जाहीरात प्रशासनांकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . त्याचबरोबर मुंबई शहर ( धारावी परिसर ) करीताची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .
तसेच अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रिक्त पदांसाठी पदभरती प्र्क्रिया जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .
पात्रता – अंगणवाडी सेविका , मिनी अंगणवाडी सेविका व मदतनिस पदांकरीता महिला उमेदवार ही इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 35 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे .विधवा उमेदवारांकरीता 40 वर्षांपर्यंत सुट असणार आहे .
अर्ज प्रक्रिया – पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज आपल्या तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाशी भेट देवून अर्ज सादर करायचा आहे .
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- बृहन्मुंबई भाभा दवाखाना अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम : पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी दरमहा मानधन योजना – अर्ज करण्यास सुरुवात .
- BAMU : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत आत्ताची नविन पदभरती !