बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या ( संवर्ग क व ड ) 10 हजार जागांसाठी नविन महाभरती प्रक्रिया ! असा करावा लागेल अर्ज !

Spread the love

बृहन्मंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या ( संवर्ग क व ड ) तब्बल दहा हजार जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून , यापैकी सध्या सुमारे 3 हजार जागांसाठी पदभरती प्रक्रिया पुर्ण करण्यात आलेली आहे . 10 हजार जागेपैकी आता 7 हजार जागेवर पदभरती प्रक्रिया बाकी आहे .राज्य शासनाने दिलेल्या सुचनेनुसार येत्या 15 मे पर्यंत सर्व रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया पुर्ण असणे आवश्यक आहे .

यानुसार बृहन्मुंबई पालिका प्रशासनांकडून पदभरती प्रक्रिया लवकरच पुर्ण करण्यात येणार आहे .यामध्ये संवर्ग क मध्ये शिक्षक , लिपिक, लेखापाल , उद्यान निरीक्षक ,प्रयोगशाळा सहाय्यक ,मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी , विस्तार अधिकारी  , अभियंता ,वाहनचालक ,आयटीआय अर्हतापुर्ण पदे इ.पदे भरण्यात येणार आहेत .

तर संवर्ग ड मध्ये शिपाई , माळी , सफाईगार , चौकीदार , स्वच्छता कामगार , स्मशान कामगार ,सुरक्षा रक्षक इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत .नविन बिंदुनामावलीनुसार संवर्ग ड मधील काही पदे हे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत . तर अत्यावश्यक बाबींकरीताचे पदे हे कायमस्वरुपी पद्धतीने भरण्यात येणार आहेत .

सदरच्या पदभरती प्रक्रियामुळे राज्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणात नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे .कोरोना महामारीनंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात पदभरती प्रक्रिया करण्यात आलेली नाही .यामुळे रिक्त पदांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ झालेली आहे , या रिक्त पदांवर तातडीने पदभरती करण्याचे आदेश राज्य शासनाने दिलेले आहे .

अधिक माहीतीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment