मुंबई उच्च न्यायालयामध्ये 7 वि उत्तीर्ण उमेदवारांसाठी शिपाई / हमाल पदांकरिता मोठी पदभारती प्रक्रिया ! लगेच अर्ज करा !

Spread the love

मुंबई उच्च न्यायालय मध्ये शिपाई / हमाल पदाकरिता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . सदर पदभरती प्रक्रियाचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे पाहूया..

मुंबई उच्च न्यायालय मध्ये सद्यस्थितीमध्ये 24 शिपाई/ हमाल पदाकरिता रिक्त जागा असून , पुढील दोन वर्षांमध्ये 109 जागा असे एकूण 133 जागा रिक्त होणार आहेत . सदर 133 व 32 प्रतीक्षा यादी करिता असे एकूण मिळून 160 उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे . यामध्ये दिव्यांगासाठी 4% म्हणजेच 05 पदे राखीव ठेवण्यात येणार आहेत .

पदभरती जाहिरात पाहा

आवश्यक पात्रता – शिपाई /हमाल पदाकरिता उमेदवार हा कमीत कमी इयत्ता सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेपर्यंत उमेदवाराची किमान वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे , तर कमाल वर्ष 38 वर्षापेक्षा अधिक असू नये . मागासवर्गीय उमेदवारांना 43 वर्षापर्यंत अर्ज सादर करता येईल , त्याचबरोबर न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयामध्ये विशेष सूट लागू असणार नाही .

वेतनश्रेणी – सदर शिपाई / हमाल पदाकरिता सातवा वेतन आयोगानुसार S- 1 मध्ये 15000/- रुपये ते 47,600/- रुपये या वेतनश्रेणी मध्ये वेतन अधिक , नियमाप्रमाणे इतर वेतन व भत्ते अदा करण्यात येईल .

जाहिरात व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर CLICK करा !

जाहिरात पाहा / Apply Now

Leave a Comment