CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ मध्ये विविध पदांच्या 118 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ मध्ये विविध पदांच्या एकुण 118 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central Board Of Secondary Education Recruitment For Various Post , Number of Post Vacancy  – 118 ) पदनाम , पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रशासकीय स्वीय सहाय्यक18
02.अकॅडमीक स्वीय सहाय्यक16
03.स्कील शिक्षण स्वीय सहाय्यक08
04.ट्रेनिंग स्वीय सहाय्यक22
05.खाते अधिकारी03
06.कनिष्ठ अभियंता17
07.कनिष्ठ भाषांतर अधिकारी07
08.अकाउंटेंट07
09.कनिष्ठ अकाउंटेंट20
 एकुण पदांची संख्या118

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी : कोणतीही पदवी उत्तीर्ण आवश्यक

पद क्र.02 साठी : संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी B.ED व नेट / सेट अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : लिपिक , शिपाई , संगणक सहाय्यक , निरिक्षक , भांडारपाल इ. पदांसाठी सरळसेवा पद्घतीने मोठी पदभरती, Apply Now !

पद क्र.03 साठी : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.04 साठी : संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर पदवी B.ED व नेट / सेट अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.05 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे वाणिज्य /  इकॉनॉमिक्स /  वित्त / बिझनेस स्टडी / कॉस्ट अकांटींग अथवा पदवी + SAS / JAO किंवा पदव्युत्तर पद वी (वाणिज्य /  इकॉनॉमिक्स /  वित्त / बिझनेस स्टडी / कॉस्ट अकांटींग ) अथवा एमबीए / चार्टर अकौंटींग / ICWA अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

पद क्र.06 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.ई / बी.टेक ( सिव्हिल ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.07 साठी : इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य अर्हता , हिंदी  / इंग्रजी अनुवादात डिप्लोमा / प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.08 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे वाणिज्य /  इकॉनॉमिक्स /  वित्त / बिझनेस स्टडी / कॉस्ट अकांटींग मध्ये पदवी व संगणकावर इंग्रजी 35 श.प्र.मि किंवा हिंदी 30 श.प्र.मि टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.09 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे 12 वी उत्तीर्ण तसेच संगणकावर इंग्रजी 35 श.प्र.मि  किंवा हिंदी 30 श.प्र.मि टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.cbse.gov.in/cbsenew/recruitment.html  या संकेतस्थळावर दिनांक 11.04.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती मध्ये पद क्र.01 ते 05 करीता 1500/- रुपये तर पद क्र.06 ते 09 करीता 800/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment