केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये 215 जागांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Central Industrial Security Force Recruitment For Head Constable Post , Number of Post Vacancy – 215 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये हेड कॉन्स्टेबल – जनरल ड्युटी ( खेळाडू ) पदांच्या 215 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच खेळ / ॲथलेटिक्समध्ये राज्य / राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 23 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cisfrectt.cisf.gov.in/index.php या संकेतस्थळावर दिनांक 30 ऑक्टोंबर 2023 पासून ते 28.11.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !