CRPF : केंद्रीय राखीव पोलिस दल अंतर्गत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी तब्बल 9195 रिक्त जागेसाठी महाभरती !

Spread the love

CRPF : केंद्रीय राखीव पोलिस दल अंतर्गत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी तब्बल 9195 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Central reserve police force constable recruitment for constable post , number of post vacancy -9195 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कॉन्स्टेबल ( ट्रेड्समन व तांत्रिक )9175
02.कॉन्स्टेबल ( पायोनियर विंग )20
 एकुण पदांची संख्या9195

आवश्यक अर्हता :

पद क्र.01 साठी : 10 वी उत्तीर्ण , अवजड वाहन  चालक परवाना

पद क्र.02 साठी : 10 वी उत्तीर्ण , आयटीआय मेकॅनिक मोटर व्हेईकल

पद क्र.03 साठी : 10 वी उत्तीर्ण , मेसनरी / इलेक्ट्रिशियन

उर्वरित पदांसाठी : 10 वी उत्तीर्ण

शारिरीक पात्रता :

पुरुष उमेदवारांसाठी

प्रवर्गउंचीछाती
जनरल / ओबीसी157 से.मी80 से.मी व 5 से.मी फुगवता आली पाहिजे .
एसटी162.5 से.मी76 से.मी व 5 से.मी फुगवता आली पाहिजे .

वयोमर्यादा ( Age Limit ) : दि.01.01.2026 रोजी अनुसुचित जाती / जमाती करीता वयात 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षे सुट देण्यात येईल .

कॉन्स्टेबल ( वाहनचालक ) पदासाठी : 21-27 वर्षे दरम्यान ..

उर्वरित पदांकरीता : 18-23 वर्षे दरम्यान ..

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 100/- रुपये तर मागास / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  http://www.rect.crpf.gov या संकेतस्थळावर दि.20.04.2026 पासुन ते दि.19.05.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment