जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळ आस्थापनेवरील सफाईगार पदाकरिता उमेदवारांची निवड प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रता धारक उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये ऑफलाइन पद्धतीने / पोस्टाद्वारे आवेदन मागविण्यात येत आहेत . पदाचे नाव , आवश्यक पात्रता ,वेतनश्रेणी यासंदर्भातील सविस्तर पदभरती तपशील पुढील प्रमाणे पाहूयात ..
पदनाम / पात्रता : जिल्हा सत्र न्यायालय यवतमाळ मध्ये सफाईगार या पदाच्या एकूण 09 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरिता उमेदवार हा प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे . सदर पदाकरिता शिक्षणाची कोणतीही अट जाहिराती मध्ये नमूद करण्यात आलेली नाही .
वयोमर्यादा : सदर पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिवशी उमेदवाराचे किमान वय 18 वर्ष पेक्षा कमी नसावे , तर सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांकरिता 38 वर्षापेक्षा जास्त वय नसावे , तर राखीव / मागासवर्गीय उमेदवारांकरिता 43 वर्षापेक्षा अधिक वय नसावे .
कामाचे स्वरूप : निवड झालेल्या उमेदवारास जिल्हा न्यायिक विभागांतर्गत कोणत्याही न्यायालयात सफाईगार या पदावर नियुक्ती दिली जाईल , नियुक्तीनंतर उमेदवारास न्यायालयाच्या इमारतीतील व निवासस्थानातील प्रसाधनगृहाची ,इमारतीची व परिसराची नियमित स्वच्छता व साफसफाई करणे निगा राखणे इत्यादी कर्तव्य पार पाडावी लागणार आहेत . त्याचबरोबर उमेदवारांना न्यायालयाच्या आवारातील जागेची निगा राखणे , कामी आवश्यक ती सर्व कामे करावी लागणार आहेत .
हे पण वाचा : भारतीय रेल्वे मध्ये मोठी मेगाभर्ती , लगेच करा आवेदन !
वेतनश्रेणी : सफाईगार या पदाकरिता सातव्या (7 व्या ) वेतन आयोगानुसार वेतन स्तर S-1 या सुधारित वेतन संरचनेत रुपये 15000/- व नियमानुसार देय असणारे वेतन व भत्ते लागू असतील .
अर्ज प्रक्रिया : जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज प्रबंधक जिल्हा न्यायालय यवतमाळ या पत्त्यावर दिनांक 12 जून 2023 पर्यंत पोहोचेल , अशा पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 378 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन .
- NHPC : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 118 जागेसाठी पदभरती , Apply Now !
- ठाणे पालिका प्रशासन मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .