महाराष्ट्र वन विभागामध्ये व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान मध्ये पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्याच्या वन विभागामध्ये ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपुर अंतर्गत पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन ई-मेलद्वारे आवेदन मागविण्यात येत आहेत .पदनाम , पात्रता ,नोकरीचे ठिकाण , वेतनमान याबाबत सविस्तर पदभरती माहीती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

यांमध्ये लेखापाल या पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा  बी.कॉम /एम .कॉम /एम.बी.ए फायनान्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर टॅली ERP 9 प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच इंग्रजी टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर उमेदवारांस हिंदी , मराठी व इंग्रजी भाषा बोलता , लिहता व वाचता येणे आवश्यक असणार आहे .

निवड प्रक्रिया : सदर पदांकरीता वैयक्तिक मुलाखतीसाठी केवळ प्राथमिक निवड झालेल्या उमेदवारांनाच बोलविण्यात येणार आहे , मुलाखतीकरीता येणाऱ्या उमेदवारांना कोणताही भत्ता ( TA /DA ) लागु राहणार नाही . मुलाखतीची दिनांक / वेळ Short Listing करण्यात आलेल्याच उमेदवारांना कळविण्यात येणार आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य दारूबंदी पोलीस विभागामध्ये मोठी मेगाभर्ती , लगेच करा आवेदन !

वेतनमान – सदर पदभरती प्रक्रिया ही कंत्राटी तत्वावर भरण्यात येत असल्याने लेखापाल या पदांकरीता प्रतिमहा 15,000/- रुपये वेतनमान देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया – सदर पदांकरीता आवश्यक पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज संचालक , ताडोबा – अंधारी प्रकल्प , चंद्रपुर माता मंदीर जवळ मुल रोड चंद्रपुर -442401 या पत्त्यावर अथवा [email protected] या मेलवर दि.06 जुन 2023 पर्यंत सर्व आवश्यक कागतपत्रांसह आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment