महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागांमध्ये विविध पदांच्या 512 जागांसाठी मेगाभरती , Apply Now Online !

Spread the love

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागांमध्ये विविध गट क व ड संवर्गातील पदांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदांनुसार आवश्यक पात्रता , वेतनश्रेणी , अर्ज प्रक्रिया , आवेदन शुल्क याबाबत सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

यांमध्ये लघुलेखक पदांच्या एकुण 05 जागा , लघुटंकलेखक पदांच्या एकुण 16 जागा , जवान पदांच्य 371 जागा , जवान नि-वाहनचालक पदांच्या 70 जागा तर चपराशी पदांच्या 50 जागा असे एकुण 512 जागांसाठी पदभरती प्रकिया राबविण्यात येत आहेत .खालील नमुद जाहीरातीमध्ये जिल्हानिहाय रिक्त पदांची संख्या समांतर आरक्षण निहाय नमुद करण्यात आलेले आहेत .

सातव्या वेतन आयोगानुसार पदनिहाय वेतनश्रेणी :

1) लघुलेखक ( निम्न श्रेणी ) : S- 15 मध्ये 41,800-132,300/- अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय अनुज्ञेय असणार आहेत .

2) लघुटंकलेखक  : S- 8 मध्ये 25,500-81,100/-  अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय अनुज्ञेय असणार आहेत .

3) जवान / जवान -नि- वाहनचालक  : S- 7  मध्ये 21,700-69,100/- अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय अनुज्ञेय असणार आहेत .

4) चपराशी  : S- 1 मध्ये 15,000-47600 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय अनुज्ञेय असणार आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र शासन सेवेत 75,000 जागांसाठी महाभरती नवीन जाहिरात पाहा !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://stateexcise.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर दि.30 मे 2023 पासून दि.13 जून 2023 पर्यंत सादर करायचे आहे .यांमध्ये लघुटंकलेख पदांसाठी 900/- तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 810/- रुपये तर जवान पदांकरीता 735/-रुपये व राखीव प्रवर्गाकरीता 660/- रुपये आवेदन शुल्क आकरण्यात येईल .

तर जवान-नि-वाहनचालक व चपराशी पदांकरीता 800/- तर मागास प्रवर्गाती उमेदवारांकरीता 720/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा ( PDF )

जाहिरात पाहा

Leave a Comment