स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये राज्य शासन सेवेत 75 हजार पदे भरण्यासंदर्भात नवीन पदभरती जाहिरात निर्गमित !

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासन सेवेमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात तब्बल 75 हजार पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्यासंदर्भात राज्य शासनाच्या ग्रामीण विकास विभागाकडून नवीन सुधारित पदभरती शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर पद भरती प्रक्रिया शासन परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की ग्रामविकास विभागाच्या अधिपत्याखालील गट क संवर्गातील आरोग्य व इतर विभागातील संवर्गाच्या पद भरतीच्या कालाबद्ध कार्यक्रम विभागाच्या अनुक्रमे दिनांक 21 ऑक्टोबर 2022 व दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार , जाहीर करण्यात आला होता . सदर जाहिरातीनुसार सर्व जिल्हा परिषदेमधील विविध संवर्गातील तब्बल 18 हजार 939 पदे भरण्यात येणार आहेत .

सदर पद भरती प्रक्रिया मध्ये दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या सर्व पदभरती जाहिरातीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेमध्ये दोन वर्षांची शितलता देण्यात येणार आहे . या संदर्भात राज्य शासनाकडून दिनांक 16 मार्च 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

हे पण वाचा : खाजगी / अनुदानित शाळा मध्ये तसेच सहकारी संस्था मध्ये मोठी पदभरती प्रक्रिया !

सदर पद भरती प्रक्रिया शासन परिपत्रकामध्ये पदनिहाय आवश्यक शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर परीक्षेचे वेळापत्रक पदांची नावे , वेतनश्रेणी नमूद करण्यात आलेली आहे . सदर पदभरती प्रक्रिया दिनांक 15 ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आली आहेत .

सदर पद भरती प्रक्रिया संदर्भातील राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला सुधारित पदभरती प्रक्रिया शासन परिपत्रक डाऊनलोड करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करावे .

सुधारित पदभरती शासन परिपत्रक

Leave a Comment