महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागांमध्ये लिपिक , जवान , वाहनचालक व चपराशी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदनाम , पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता , पदांची संख्या ,अभ्यासक्रम ,अर्ज पद्धती याबाबत सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदांचे नावे / पदसंख्या – यांमध्ये राज्यातील राज्यस्तरीय संवर्गाकरीता लघुलेखक ( निम्नश्रेणी ) पदांच्या एकुण 05 जागा तर लघुटंकलेखक पदांच्या एकुण 16 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . तर जिल्हास्तरीय संवर्गाकरीता जवान पदांच्या एकुण 371 जागा , जवान – नि – वाहनचालक पदांच्या एकुण 70 जागा तर चपराशी पदांच्या एकुण 50 जागा असे एकुण 512 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
शैक्षणिक पात्रता / इतर आवश्यक अर्हता –
लघुलेखक (निम्न श्रेणी ) या पदांकरीता उमेदवार हा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तसेच लघुलेखनाची गती 100 श.प्र.मि व मराठी टंकलेखनाची गती 30 श.प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ही 40 श.प्र.मि इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
लघुटंकलेखक : लघुटंकलेखक पदांकरीता उमेदवार हा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तर लघुलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द मिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
जवान / जवान – नि -वाहनचालक : जवान या पदांकरीता उमेदवार हा माध्यमिक शाळा ( SSC ) प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर जवान – नि- वाहनचालक या पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 7 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच वाहन चालविण्याचा परवाना ( किमान हलके चारचाकी वाहन ) असणे आवश्यक असणार आहे .जवान / जवान – नि-वाहनचालक या पदांकरीता पुरुष उमेदवाराची किमान उंची 165 से.मी तर महिला उमेदवारांसाठी 160 से.मी असणे आवश्यक आहे .तर पुरुष उमेदवारांकरीता 79 से.मी छाती व 5 से.मी फुगवता येणे आवश्यक आहे . तर महिला उमेदवारांसाठी किमान वजन 50 कि.ग्रॅ. असणे आवश्यक आहे .
चपराशी – चपराशी पदांकरीता उमेदवार हा माध्यमिक शाळा ( SSC ) प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
अधिक माहीतीकरीता अधिकृत्त जाहीरात / अर्ज सादर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे !
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..