महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना व मुल्यनिर्धाण विभाग मध्ये गट ब अराजपत्रित पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra state nagar Rachana & Mulyanirdharan department recruitment ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | रचना सहाय्यक (गट ब ) | 261 |
| 02. | उच्चश्रेणी लघुलेखक ( गट ब ) | 09 |
| 03. | निम्नश्रेणी लघुलेखक ( गट ब ) | 19 |
| एकुण पदांची संख्या | 289 |
शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे स्थापत्य अभियांत्रिकी अथवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी अथवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी अथवा वास्तुशास्त्र अथवा बांधकाम तंत्रज्ञान या मधील मान्यताप्राप्त संस्थेची तीन वर्षाची पदविका अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण तसेच लघुलेखनाचा वेग किमान 120 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 श.प्र.मि अथवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 श.प्र.मि या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र उत्तीर्ण आवश्यक .
हे पण वाचा : लाईफकेअर लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 1121+ जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
पद क्र.03 साठी : : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण तसेच लघुलेखनाचा वेग किमान 100 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 श.प्र.मि अथवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 श.प्र.मि या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र उत्तीर्ण आवश्यक .
परीक्षा शुल्क : अराखीव ( खुला ) प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 900/- रुपये ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn3.digialm.com/EForms/या संकेतस्थळावर दिनांक 29 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .