नमस्कार मित्रांनो आपण आज PM फ्री २०२२ शिलाई मशीन योजना महाराष्ट्र संबंधित संपूर्ण मराठी माहिती आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहे. यामध्ये या योजनेचे वैशिष्ट्य काय आहे, या योजनेसाठी कुठे अर्ज करायचा, तसेच योजनेसंबंधी चा ऑनलाईन फॉर्म, ऑनलाइन एप्लीकेशन, ऑनलाईन रजिस्ट्रेशन, आवश्यक कागदपत्रे, पात्रता, अर्जाची प्रक्रिया, टोल फ्री नंबर इत्यादी सर्व गोष्टींची पूर्णपणे माहिती आपण आज या लेखामध्ये पाहणार आहे
Free Silai Machine Yojana Maharashtra Highlights
योजनेचे नाव फ्री शिलाई मशीन योजन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ या वर्षी आरंभ केला.
ग्रामीण भागातील महिला लाभार्थी
उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना असलेल्या आर्थिक मदत करून स्वावलंबी बनवणे
आणि उत्पन्नाच्या संधी उपलबद्ध करून देणे हा
केंद्र सरकारच्या योजना
अधिकृत संकेतस्थळ www.india.gov.in
Free Silai Machine Yojana Maharashtra 2022
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या फ्री सिलाई मशीन योजनेचा लाभ आज आपल्या देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना मिळणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यामध्ये ५० हजाराहून अधिक महिलांना मोफत ही शिलाई मशिन उपलब्ध करून दिली जाणार आहे. कारण महिला घर बसल्यास स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील. ही योजना मिळण्यासाठी २० ते ४० वयोगटातील महिलअर्ज भरू शकतात आणि या फ्री सिलाई मशीन योजनेचा लाभ महिला घेऊ शकतात.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांना काम देण्यासाठी मोफत शिलाई मशीन योजना ही वर्ष२०२२ मध्ये सुरू केलेआहे. देशातील गरीब आणि कष्टकरू महिलांना मोफत केंद्र शासनाकडून शिलाई मशीन देण्यात येणार आहे. त्यामुळे महिला घरी बसून सुद्धा स्वतःचा रोजगार सुरू करू शकतात आणि त्यातून चांगले उत्पन्न ही मिळवू शकतात.
Free Silai Machine Yojana Maharashtra 2022 उद्दिष्ट काय?
२०२२मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फ्री शिलाई मशीन योजना सुरू केलेली आहे. देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या महिलांना मोफत शिलाई मशिन उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे देशातील महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि त्या घरबसल्या काम करून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करु शकतील. कामगार महिला या योजनेच्या माध्यमातून स्वावलंबी आणि सक्षम बनु शकतात. त्याचप्रमाणे त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. फ्री शिलाई मशीन या योजनेचा लाभ देशातील बऱ्यापैकी राज्यांमधील स्त्रिया घेऊ शकतात.
साठी मोफत शिलाई मशीन २०२२ साठी कोण कोण आहे पात्र पाहा सर्व माहिती.
या योजनेअंतर्गत अर्जदार महिलांचे वय २० ते ४० वर्षे असावेत.
अर्जदार महिलांच्या पतीचे वार्षिक उत्पन्न (तहसीलदार उत्पन्न दाखल्यानुसार) १२,०००/- रुपयांपेक्षा जास्त नसावे.
देशातील विधवा आणि अपंग महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेमध्ये कोणती राज्ये समाविष्ट आहेत? केवळ ही योजना काही राज्यांमध्ये लागू करण्यात आली आहे, काही काळानंतर ही योजना संपूर्ण देशात लागू करतात येईल. ही
योजना लागू झालेल्या रज्यांचे नावे कोणकोणती आहेत ते खालीलप्रमाणे पाहा-
१)हरियाणा
२)गुजरात
३)महाराष्ट्र
४)उत्तर प्रदेश
५)कर्नाटक
६)राजस्थान
७)मध्य प्रदेश
८)छत्तीसगड
९)बिहार
या योजनेचा लाभ लागु होण्यासाठी आवश्यक ती लागणारी कागदपत्रे कोणती आहेत हे पहा?
१)आधार कार्ड
२)वय प्रमाणपत्र.
३)उत्पन्न प्रमाणपत्र.
४)ओळखपत्र.
५)अपंग असल्यास अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र .
६)विधवा महिला असल्यास तिचे निरीक्षक विधवा प्रमाणपत्र.
७)समुदाय प्रमाणपत्र.
८)पासपोर्ट आकाराचा फोटो.
९)मोबाईल नंबर.
शिलाई मशीन योजना मोफत फॉर्म २०२२ साठी अर्ज कसा करावा?
१)या योजनेंतर्गत, इच्छुक महिलांना अर्ज करायचा असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला भारत सरकारच्या अधिकृत वेबसाइट वर भेट द्यावी लागेल .
२)यानंतर वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर दिसेल.
३)वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर तुम्हाला अर्ज मिळवून तो भरावा लागेल .
४)अर्ज मिळवल्यानंतर, तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक, आधार कार्ड इत्यादी सर्व योग्य व अचूकपणे भरावी लागेल.
५)सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला तुमच्या अर्जासोबत एक फोटो देखील जोडावा लागेल.
६)या योजनेसाठी चा फॉर्म हा तुम्हाला कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये म्हणजेच ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय किंवा जिल्हा कार्यालय अशा सरकारी कार्यालयांमध्ये तुम्ही हा फॉर्म जमा करू शकता.
७)त्यानंतर, कार्यालयाच्या अधिकाऱ्याकडून तुमच्या अर्जाची तपासणी केली जाईल. तपासणी झाल्यानंतर, तुम्हाला मोफत शिवण मशीन दिली जाईल.