महाराष्ट्र पोलिस दलांमध्ये पोलिस शिपाई व पोलिस चालक शिपाई भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आलेली होती . अखेर या पदभरतीवरील स्थगिती राज्य शासनाकडुन उठविण्यात आलेली आहे .पोलिस संवर्गातील पोलिस शिपाई व पोलिस चालक शिपाई पदांच्या एकुण 17,130 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .पोलिस शिपाई संवर्गातील सविस्तर पदभरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात .
राज्यातील सर्वच जिल्हातील रिक्त पोलिस शिपाई व पोलिस चालक शिपाई पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . पोलीस शिपाई पदांच्या एकूण 14,156 जागा आहेत तर पोलिस चालक शिपाई पदांच्या एकूण 2,174 जागा आहेत .जिल्हानिहाय तसेच घटक निहाय पोलिस शिपाई व पोलिस चालक शिपाई संवर्गातील रिक्त पदांची संख्या पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पहावी .
पात्रता / वयोमर्यादा – पोलिस शिपाई व पोलिस चालक शिपाई पदांसाठी उमेदवार कोणत्याही शाखेतुन 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच जनरल प्रवर्गातील उमेदवारांचे वय 18 ते 28 वर्षादरम्यान असणे आवश्यक आहे .तर मागासवर्गीय उमेदवारांकरीता 18 ते 33 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – सदर पदांकरीता ऑनलाईन पद्धतीने https://www.mahapolice.gov.in/ या संकेतस्थळावर दि.09.11.2022 पासुन अर्ज करु शकता .दोन्ही संवर्गातील पदांकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 30.11.2022 असणार आहे .सदर पदभरती करीता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 450/- रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांना 350/- आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
पोलीस शिपाई पदासाठी – जाहिरात पाहा
पोलीस चालक शिपाई पदासाठी – जाहिरात पाहा
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..