गोंदिया जिल्हा पोलिस दलामध्ये पेालिस शिपाई पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Gondia District Police Department Recruitment For Police Constable Post , Number of Post Vacancy – 110 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये पोलिस शिपाई पदांच्या एकुण 110 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Police Constable Post , Number of Post Vacancy – 110 )
शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) ; सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच MSCIT / CCC प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : विविध गट क व गट ड संवर्गातील पदांसाठी सरळसेवा पद्धतीने मोठी पदभरती !
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता कमाल वय हे 33 वर्षे तर अपंग प्रवर्गातील उमेदवारांकरीता कमाल वय हे 45 वर्षे पर्यंत सुट देण्यात येत आहे .
शारीरिक पात्रता : सदर पदांकरीता पुरुष उमेदवाराची किमान उंची ही 168 से.मी पर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . तसेच छाती 79 से.मी तर 05 से.मी फुगवता आली पाहिजे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://policerecruitment2024.mahait.org/ या संकेतस्थळावर दिनांक 05 मार्च 2024 पासुन ते दिनांक 31 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 450/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 350/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- धन्वंतरी महाविद्यालय नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CSIR : केंद्रीय रस्ते संशोधन संस्था अंतर्गत गट क ( Class C ) पदाच्या 209 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- RCFL : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. अंतर्गत विविध पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- सैनिकी शाळा सातारा अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !