बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीच मोठी सुवर्ण संधी आलेली आहे , ती म्हणजे सरकारी बँकेमध्ये तब्बल 5000+ जागेकरीता महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदाकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता धारक उमेदवारांनी आपला अर्ज विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे . सदर बँक महाभरती प्रक्रिया बाबतची सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही बँक भारतामधील सार्वजनिक क्षेत्रामधील अग्रणी बँक असून , या बँकेमध्ये देशातील विविध शाखांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .एकुण पदांची संख्या 5000+ असून या पदांकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवी धारण केलेला असणे आवश्यक आहे . सदर बँकेमध्ये पदांनुसार विविध पदांवर नियुक्त देण्यात येणार आहे .
सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दि.31 मार्च 2023 रोजी किमान 20 वर्षे ते कमाल 28 वर्षे वयोमर्यादा असणे आवश्यक आहे . यामध्ये मागास प्रवर्ग करीता पाच तर इतर मागास प्रवर्गाकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / फीस – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली नमूद संकेतस्थळावर सादर करायचा आहे . सदर पदभरती करीता 800/- फीस आकारली जाईल , तर मागास प्रवर्गाकरीता / महिला उमेदवारांना 400/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !