अन्न नागरी , पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामध्ये शिपाई पदांसाठी मोठी सुवर्णसंधी आली असून , पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे . पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता , वयोमर्यादा , यासंदर्भात सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया..
अन्न नागरी , पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामध्ये आस्थापना शाखा करिता इयत्ता दहावी पात्रता धारक उमेदवारांकडून शिपाई पदाकरिता पद भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून , शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून विहित कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहे.
पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज आस्थापना शाखा दालन क्रमांक 219 दुसरा मजला हुतात्मा राजगुरू चौक मादाम कामा मार्ग , मंत्रालय मुंबई या पत्त्यावर दिनांक 2 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे . शिपाई पदाकरिता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराची किमान वय 18 वर्षे तर , कमाल वय 40 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे .
शिपाई हे पद बाह्य स्त्रोताद्वारे भरण्यात येणार असल्याने सदर पदाकरिता वेतन हे राज्य शासनाच्या किमान वेतन धोरणानुसार अदा करण्यात येणार आहे . यासंदर्भातील सविस्तर पद भरती जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
- ठाणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध गट क व ड संवर्गातील रिक्त पदांसाठी पदभरती .
- MPSC : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग अंतर्गत गट क पदांच्या एकुण 2619 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका ..
- महाराष्ट्र अग्निशमन सेवा अंतर्गत फायरमन व अधिकारी पदांसाठी प्रवेश प्रक्रिया 2027 अंतर्गत भरती ..
- कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 148 रिक्त जागेसाठी पदभरती .
- AVNL : आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1213 रिक्त जागेसाठी पदभरती ..