शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे गट ड संवर्गातील विविध पदांसाठी सरळसेवा पद्धतीने महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येथे गट – ड संवर्गातील विविध पदांसाठी सरळसेवा पद्धतीने महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . (Government Medical College Dhule , Recruitment For Class D Post , Number of Post Vacancy -137 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रयोगशाळा परिचर07
02.शिपाई09
03.पहारेकरी05
04.शवविच्छेदन परिचर03
05.प्राणी गृह परिचर01
06.दप्तरी01
07.परिचर02
08.सफाईगार26
09.शिंपी01
10.दंत परिचर01
11.उदवाहन चालक01
12.वस्तीगृह सेवक01
13.कक्षसेवक31
14.रुग्णपट वाहक02
15.न्हावी03
16.धोबी04
17.चौकीदार03
18.प्रयोगशाळा परिचर01
19.माळी01
20.कक्षसेवक / आया / महिला / कक्ष आया09
21.बाह्यरुग्ण विभाग सेवक05
22.सुरक्षा रक्षक03
23.प्रमुख स्वयंपाकी04
24.सहाय्यक स्वयंपाकी02
25.स्वयंपाकी सेवक05
26क्ष- किरण सेवक03
 एकुण पदांची संख्या137

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : यांमध्ये सफाईगार पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 7 वी तर न्हावी पदांकरीता 10 वी + आयटीआय ( केस कर्तनालय ) अर्हता , तर माळी पदांकरीता 10 वी + माळी प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत तर उर्वरित सर्व पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : राज्य शासन सेवेत गट – ड  संवर्गाच्या नियमित पद्धतीने महाभरती , 15,000-47,600/- एवढा मिळेल पगार !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/sbhgmcdec23/ या संकेतस्थळावर दिनांक 03 जानेवारी 2024 पासुन ते दि.24.01.2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग 1000/- रुपये तर मागास / आ.दु.घ / दिव्यांग प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा  

जाहिरात पाहा

Leave a Comment