जिल्हा परिषद पुणे अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 364 जागांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

जिल्हा परिषद पुणे येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 364 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune ZP – National Health Mission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 364 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वैद्यकीय अधिकारी120
02.स्टाफ नर्स124
03.बहुउद्देशिय आरोग्य सेवक120
 एकुण पदांची संख्या364

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) / वयोमर्यादा :

पद क्र.01 साठी : उमेदवार हे एमबीबीएस अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तर वयाच्या 70 वर्षापर्यंतचे उमेदवार आवेदन करु शकता ..

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मध्ये तब्बल 5,347 जागांसाठी महाभरती , अर्ज करायला विसरु नका !

पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमदेवार हे जीएनएम अथवा बी.एस्सी ( नर्सिंग ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तर वयाच्या 65 वर्षापर्यंतचे उमेदार आवेदन सादर करु शकता ..

पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतुन उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स / सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय हे 65 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://pmcuhwcrecruitment या संकेतस्थळावर दिनांक 16 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 300/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment