India Post : भारतीय टपाल विभाग मध्ये पोस्टमन / मेलगार्ड / MST पदांच्या 98083 जागांसाठी अखेर जाहीरात प्रसिद्ध ! Apply Now !

Spread the love

भारतीय टपाल विभाग मध्ये मेलगार्ड / पोस्टमन व मल्टी टास्किंग पदांच्या 98083 जागांसाठी मेगाभरती बाबत अखेर भारती टपाल विभागाकडुन नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहेत .सदर पदभरती पोस्टातील रिक्त जागांवर भरती राबविण्यात येत असुन , पात्रताधारकांकडुन विहित कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येणार आहेत . सदर टपाल विभाग पदभरती प्रक्रिया बाबत सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे पाहुयात .

भारतीय टपाल कार्यालयामध्ये अनेक पदे रिक्त असल्याने सदर रिक्त पदांच्या जागांची संख्या पोस्ट विभागाकडुन जारी करण्यात आले आहेत . भारतीय टपाल कार्यालयामध्ये सध्या 98083 जागा रिक्त आहेत , या रिक्त पदांच्या 100 टक्के पदे भरण्यास केंद्र शासनाकडुन मंजुरी मिळालेली आहे . 98,083 जागांपैकी महाराष्ट्र राज्य पोस्ट सर्कल मध्ये पोस्टमन पदांच्या एकुण 9884 जागा रिक्त आहेत , तर मेलगार्ड पदांच्या एकुण 147 जागा तसेच मल्टी टास्किंग पदांच्या एकुण 5478 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .

सदर पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता – पोस्टमन / मेलगार्ड व मल्टी टास्किंग पदांकरीता उमेदवार इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर राज्यनिहाय राज्य भाषेचे ज्ञान असणे आवश्यक , महाराष्ट्र राज्यासाठी मराठी तर गोवा राज्यासाठी मराठी / कोकणी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे .

वयोमर्यादा – सदर पदभरती करीता उमदेवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 27 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे . मागास प्रवर्गातील तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 5 वर्षे सुट देण्यात येईल .

वेतनमान – सदर वरील सर्व पदांकरीता सातव्या वेतन आयोगानुसार – 21,700-69100/- या वेतन श्रेणीमध्ये वेतन लागु असणार आहे त्याचबरोबर इतर लागु असणारे वेतन + भत्ते अनुज्ञेय असणार आहेत .

पोस्ट विभागामधील रिक्त पदांची नोटीफिकेशन टपाल विभागाकडुन प्रसिद्ध करण्यात आली असून , या पदांवर लवकरच ऑनलाईन पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे . रिक्त पदांची नोटिफिकेशन तपशिल पुढीलप्रमाणे पाहु शकता .

Leave a Comment