12 वी पात्रताधारकांसाठी भारतीय हवाई दल मध्ये अग्निवीरवायु जवान पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

12 वी पात्रताधारकांसाठी भारतीय हवाई दल मध्ये अग्निवीरवायु जवान पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian air force agniveervayu post recruitment ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये अग्निवीरवायु इनटेक ( 2025 बॅच ) पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . पदांची संख्या तुर्तास निर्दिष्ट करण्यात आलेली नाही ..

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह 12 वी विज्ञान या शाखेतुन ( गणित , भौतिक शास्त्र व इंग्रजी विषयांसह ) उत्तीर्ण असणे आवश्यक असेल अथवा इंजिनिअरिंग डिप्लोमा अथवा 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण + 50 टक्के गुणांसह इंग्रजी उत्तीर्ण आवश्यक ..

हे पण वाचा : पॉवर ग्रिड महामंडळ मध्ये विविध पदांच्या 435 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

शारीरिक पात्रता : पुरुष उमेदवारांकरीता किमान उंची 152.5 सेमी तर महिला प्रवर्ग करीता 152.00 सेमी असणे आवश्यक असेल . तर फक्त पुरुष उमेदवारांकरीता छाती 77 सेमी व किमान 5 सेमी फुगवता आली पाहिजे ..

वयोमर्यादा ( Age limit ) : अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचा जन्म हा दिनांक 03 जुलै 2004 ते दिनांक 03 जानेवारी 2008 दरम्यान झालेला असणे आवश्यक असेल ..

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://agnipathvayu.cdac.in/avreg/candidate/login या संकेतस्थळावर दिनांक 08 जुलै 2024 पासुन ते दिनांक 28 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता 550/- परीक्षा शुल्क + GST रक्कम आकारली जाईल ..

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment