भारतीय तटरक्षक दलांमध्ये 10 वी / 12 वी पात्रताधारकांसाठी नाविक / यांत्रिक पदांच्या 320 जागेसाठी महाभरती राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Coast Guard Recruitment For Navik & yantrik Post , Number of Post Vacancy – 320 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | नाविक | 260 |
02. | यांत्रिक | 60 |
एकुण पदांची संख्या | 320 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे 12 वी विज्ञान मध्ये गणित व भौतिकशास्त्र विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : 10 वी उत्तीर्ण + 03-04 वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा अथवा 10 वी व 12 वी उत्तीर्ण व 02 -03 वर्षाचा इंजिनिअरिंग डिप्लोमा ..
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचा जन्म हा 01 मार्च 2003 ते 28 फेब्रुवारी 2007 च्या दरम्यान झालेला असावा , यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची सुट तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cgept.cdac.in/icgreg/candidate/login या संकेतस्थळावर दिनांक 03 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 253 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- माऊली कॉलेज ऑफ फार्मसी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती !
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आस्थापना अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 240 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !