पोलिस दलांमध्ये किचन सेवा ( स्वयंपाक ) अंतर्गत दहावी पात्रता धारकांसाठी 819 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

केंद्र सरकारच्या इंडो बॉर्डर पोलिस दलांमध्ये किचन सेवा ( स्वयंपाक ) अंतर्गत दहावी पात्रता धारकांसाठी 819 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indo Tibetan Border Police Force Recruitment for Kennelman Post , Number of Post Vacancy – 819 ) पदनाम पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये कॉन्स्टेबल ( किचन सेवा ) पदांच्या एकुण 819 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच अन्न उत्पादन अथवा स्वयंपाक घरातील NSQF स्तर – 1 कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : SSC अंतर्गत जीडी (GD) कॉन्स्टेबल पदांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय हे दिनांक 01.10.2024 रोजी 18-25 दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . ( यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षाची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.itbpolice.nic.in  या संकेतस्थळावर दिनांक 01.10.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 100/- रुपये तर मागास / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment