पुणे महानगरपालिका मध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत विविध पदांच्या एकूण 681 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवाराकडून विहित कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( pune municipal corporation recruitment for various post , number of post vacancy – 681 ) पदनाम , पदांची संख्या, आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊया .
पदनाम ( Post Name ) : यामध्ये मेकॅनिक , ऑटो इलेक्ट्रिशियन , वेल्डिंग , पेंटिंग , सुतार , टर्नर, ब्लॅक स्मिथ, पंप ऑपरेटर , मेटल वर्क ,कनिष्ठ अभियंता , आरोग्य निरीक्षक, संगणक ऑपरेटर , सर्वेअर, माळी , आया , सुतारकाम इत्यादी पदांच्या एकूण 681 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबवली जात आहे .
आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदर पदाकरिता उमेदवार हे बारावी / आयटीआय/ डिप्लोमा /पदवीधर/ पदवीधर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . ( पदानुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्याकरिता खालील सविस्तर जाहिरात पहावी.)
वयोमर्यादा ( Age limit ) : सदर पदाकरिता उमेदवाराचे वय 18 – 35 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत नोंदणी करायची आहेत .
ऑनलाईन नोंदणी : ऑनलाइन नोंदणी करण्यात आलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने पुणे महानगरपालिकेचे संबंधित खाते किंवा समाज विकास विभाग पुणे महानगरपालिका तळमजला शिवाजीनगर पुणे या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहेत .
अधिक माहिती करिता खालील सविस्तर जाहिरात पहा
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..