जिल्हा परिषद पालघर अंतर्गत प्राथमिक शिक्षक , पदवीधर प्राथमिक शिक्षक पदांच्या एकूण 1891 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, आवश्यक पात्रता धारक उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे . ( Zilha parishad palghar recruitment for primary teacher & Graduate primary teacher post, number of post vacancy – 1891 ) पदाचे नाव , पदसंख्या ,आवश्यक शैक्षणिक पात्रता या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊया ..
पदनाम पदांची संख्या ( post name/ number of post ) : यामध्ये प्राथमिक शिक्षक (कंत्राटी ) , पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी ) पदांच्या एकूण 1891 जागे करिता महाभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्राथमिक शिक्षक ( कंत्राटी) | 1891 |
| 02. | पदवीधर प्राथमिक शिक्षक ( कंत्राटी ) | |
| एकुण पदांची संख्या | 1891 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Education Qualification ) :
प्राथमिक शिक्षक (कंत्राटी ) : HSC , D.ED / D.EL .ED / TCH , TET / CTET पेपर उत्तीर्ण अहर्ता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे
हे पण वाचा : भारतीय रेल्वे विभाग मध्ये 4096 जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !
पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी ) : D.ed / D.El.ed / D.T.ED / अथवा B.ED / B.A / BA ED , TET / CTET पेपर 01 उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .
वेतन मान : दरमहा 20,000/- रूपये.
अर्ज प्रक्रिया : जाहिराती मध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत दालन क्रमांक 17 कोळगाव पालघर बोईसर रोड पालघर (प.) या पत्त्यावर दिनांक 23 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026