महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदांमधील ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला असून , सुधारित आकृतीबंधानुसार काही वाढीव पदे मंजुर करण्यात आलेले आहेत . तर काही पदे मृत करण्यात आलेले आहेत . मृत पदांवर बाह्यस्त्रोताद्वारे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . या संदर्भात पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांकडुन दि.28.12.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्यातील 34 जिल्हा परिषदांकरीता नियमित मुंजर पदांव्यतिरिक्त आवश्यकतेनुसार अधिसंख्य पदे मंजुर करण्यात आलेली आहेत .नियमित वेतनश्रेणीवर 4,147 पदे भरण्यात येणार असून , उर्वरित 1760 पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत .नियमित वेतनश्रेणीमध्ये कार्यकारी अभियंता , उप अभियंता , सहाय्यक भुवैज्ञानिक , कनिष्ठ भूवैज्ञानिक , कनिष्ठ अभियंता , सहाय्यक लेखाधिकारी , सहाय्यक आवेदक , वरिष्ठ सहाय्यक , वरिष्ठ सहाय्यक लेखा , यांत्रिकी , रिंगमन ,कनिष्ठ सहाय्यक या पदारंचा समावेश आहे .
तर बाह्यस्त्रोत संवर्गामध्ये , वाहनचालक , चतुर्थश्रेणी कर्मचारी , माहिती शिक्षण व सुसंवाद तज्ञ त्याचबरोबर डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदांचा समावेश आहे .सदर निर्णयानुसार जिल्हा परिषदांमधील ग्रामीण पाणी पुरवठा विभागात / उपविभागातील पदांचा सुधारित आकृतीबंध या शासन निर्णयान्वये अंतिम करण्यात येत असल्यामुळे या आकृतीबंधातील 4,147 नियमित पदांपैकी वर्ग – 3 संवर्गाची सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदे भरण्या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत .
यामध्ये नमुद करण्यात आले आहे कि , वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि.31.10.2022 च्या शासन निर्णयातील सुचनांनुसार संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पदभरतीची कार्यवाही सुरु करावी .तर बाह्यस्त्रोतामधील 1760 जागांसाठी पदभरती करीता निविदा मागविण्यात येईल .
ग्रामीण पाणीपुरवठा विभागांमधील पदभरती प्रक्रिया बाबत दि.28.12.2022 रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 277 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 723 जागेसाठी महाभरती !
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !