स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये 75,000 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देणेबाबत दि.29.11.2022 रोजी झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे .महाराष्ट्र राज्य शासन सेवेत विविध विभागातील रिक्त पदांचा आकृतीबंध तसेच रिक्त जागांची संख्या राज्य शासनास सादर करण्यात आलेले असून पदभरती वेळापत्रक जाहीर करण्यात आलेला आहे .
पदभरती प्रक्रियेसाठी राज्यातील 14 विभागांकडुन सादरीकरण करण्यात आले आहेत .रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाकडुन या 14 विभागांकडुन सखाल आढावा घेवून , वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे .त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यभरातील लिपिक – टंकलेखकांची पदभरती होणार असून यासाठी माहे जानेवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे .शिवाय ज्या विभागाकडुन आकृतीबंध अंतिम झालेला आहे . अशा विभातील रिक्त कोट्यातील पदे 100 टक्के क्षमेतेने भरण्यास राज्य शासनाकडुन मुभा देणेबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे .
त्याचबरोबर ज्या विभागाकडुन पदांचा आकृतीबंध अद्यापर्यंत अंतिम झालेला नाही अशा विभागातील सरळसेवा कोट्यातील 80 टक्के पदे भरण्यास मुभा देण्यात आलेली आहे .अराजपत्रित वर्ग ब , वर्ग – क , वर्ग – ड मधील पदे ही TCS व IBPS या कंपनीमार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे .भरती प्रक्रियेबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाच्या आधारे ज्या विभागाचा आकृत्तीबंध अंतिम झालेला आहे . अशा विभागांडुन जानेवारी मध्ये भरती आयोजित करण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहेत .
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !