MPSC : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा मार्फत गट अ व ब संवर्गातील 274 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा मार्फत गट ब संवर्गातील 274 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Public Service Commission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -274 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.राज्य सेवा गट अ व गट ब (सामान्य प्रशासन विभाग )205
02.महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ व ब ( मृदा व जलसंधारण विभाग )26
03.महाराष्ट्र वन सेवा गट अ व गट ब ( महसुल व वन विभाग )43
 एकुण पदांची संख्या274

आवश्यक शैक्षणिक अर्हता :

पद क्र.01 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी अथवा 55 टक्के गुणांसह बी.कॉम +सीए / आयसीडब्ल्युए + एमबीए अथवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मध्ये 80 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती , लगेच करा आवेदन !

पद क्र.02 साठी : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.03 साठी : उमेदवार हे रसायनशास्त्र / वनस्पतीशास्त्र / गणित / भौतिकशास्त्र / सांख्यिकी / प्राणीशास्त्र / उद्यानविद्या / कृषी पदवी अथवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा : सदर पदांकरीता उमेदवाराचे वय हे दिनांक 01.04.2024 रोजी किमान वय हे 18/19 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग / आ.दु.घ / अनाथ प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर दिनांक 05 जानेवारी 2024 पासुन ते 25 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग 544/- रुपये तर मागास प्रवर्ग / आ.दु.घ / अनाथ प्रवर्ग करीता 344/- परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment