MPSC : मार्फत गट अ , ब ( राजपत्रित / अराजपत्रित ) पदांच्या 303 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग मार्फत गट अ आणि ब ( राजपत्रित / अराजपरित्रत ) पदांच्या 303 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Public Service Commission Recruitment For Various Class A & B Post , Number of Post Vacancy – 303 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

गट अ संवर्गातील पदांचे नाव / पदसंख्या :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.उपजिल्हाधिकारी09
02.सहायक राज्यकर आयुक्त12
03.उपमुख्य कार्यकारी / गट विकास अधिकारी ( उच्च श्रेणी अ )36
04.सहायक संचालक , महाराष्ट्र वित्त आणि लेखा विभाग41
05.सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी51
06.सहायक कामगार आयुक्त01
07.सहायक आयुक्त , कौशल्य विकास रोजगार विभाग02
08.सहायक आयुक्त / मुख्याधिकारी / नगरपालिका परिषद07
 एकुण पदसंख्या159

गट ब संवर्गातील ( राजपत्रित / अराजपत्रित ) संवर्गातील पदनाम / पदांची संख्या :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.MPSC विभागातील कक्ष अधिकारी17
02.सहायक गट विकास अधिकारी50
03.मुख्याधिकारी48
04.उप अधिक्षक , भुमि अभिलेख09
05.उप अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क04
06.कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी11
07.उद्योग अधिकारी ( तांत्रिक )04
 एकुण पदांची संख्या144

हे पण वाचा : राज्यांत विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

आवश्यक शैक्षणिक अर्हता :

01.सहायक संचालक , महाराष्ट्र राज्य वित्त व लेखा सेवा : सदर पदांकरीता उमेदवार हे 55 टक्के गुणांसह बी.कॉम अथवा CA / ICWA अथवा एम बी ए अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

02.सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी : सदर पदांकरीता उमेदवार हे भौतिक शास्त्र व गणित विषयासह विज्ञान किंवा अभियांत्रिकी शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

03.उद्योग अधिकारी : उद्योग अधिकारी पदांकरीता उमदेवार हे विज्ञान अभियांत्रिकी मधुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच विज्ञान शाखेतील पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

उर्वरित इतर सर्व पदांकरीता : उर्वरित इतर सर्व पदांकरीता उमेदवार हे पदवीधर अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा : उमदेवाराचे वय हे दिनांक 01.06.2023 रोजी 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mpsconline.gov.in/candidate या संकेतस्थळावर दिनांक 07 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 544/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment