MSRTC : बस महामंडळातील 31 विभागांकरीता चालक / वाहक पदांकरीता महाभरती प्रकिया 2023 ! Apply Now !

Spread the love

बस महामंडळ मधील 31 विभागांमध्ये चाकल / वाहक पदांच्या भरपुर जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .सध्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे वाढलेली असून कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासत आहे . याकरीता बस महामंडळ मार्फत सदर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

सदरची पदभरती प्रक्रिया ही कंत्राटी पद्धतीने राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता राज्य परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त / स्वेच्छानिवृत्ती झालेल्या चालकांसाठी असून , विहीत कालावधींकरीता सदर उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .सदरची पदभरती ही राज्यातील महामंडळातील 31 विभागांकरीता राबविण्यात येत आहे यामुळे तब्बल 1200+ जागेवर पदभरती होणार आहे .

पात्रता / अटी व शर्ती –

उमेदवाराचे वय 62 वर्षे पुर्ण होण्यासाठी किमान 06 महिने / त्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक असणे आवश्यक आहे . तसेच राज्य परिवहन सेवाकाळात अत्यंत गंभीर व प्राणांतिक अपघात नसणे तसेच कर्मचारी हा शिक्षा म्हणुन बडतर्फ किंवा सेवामुक्त केलेला नसावा . तसेच चालकपदी ठोस मेहनतान्यावर कामगिरी करण्यासाठी चालकाकडे अवजड वाहन चालन परवाना वैध असणे तसेच पी.एच.व्ही बिल्ला असणे आवश्यक आहे .

सदर कंत्राटी चालक पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 20,000/- रुपये म्हणजे दैनिक दर 769/- इतका मेहनताना राहील . याशिवाय कोणतेही भत्ते व अन्य लाभ देय राहणार नाहीत .याकरीता इच्छुक चालक उमेदवारांनी करारपद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी संबंधित नजिकच्या विभागांमध्ये विहीत नमुन्यात अर्ज सादर करायचा आहे .

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा  

जाहिरात पाहा

Leave a Comment