महाराष्ट्र शासन सेवेत वर्ग ब व वर्ग क संवर्गातील 16,840 जागांसाठी महाभरती ! अखेर GR निर्गमित दि.09.01.2023

Spread the love

महाराष्ट्र राज्य भुतपुर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील , महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट ब अराजपत्रित व गट क संवर्गातील पदांच्या भरतीसाठी निवड समिती स्थापन करणेबाबत राज्य शासनाकडुन दि.09.01.2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे , सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात .

कामगार आयुक्त मुंबई यांच्या अधिपत्याखालील भुतपुर्व दुय्यम सेवा निवड मुंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब गट क व गट संवर्गातील राज्यस्तरीय व प्रादेशिक स्तरीय पदे भरण्यासाठी निवड समित्यांची स्थापना करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आली होती . भुतपुर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील वर्ग ब , वर्ग क व वर्ग ड  संवर्गातील पदे सरळसेवेने भरताना स्पर्धा परीक्षा प्रक्रिया टी.सी.एस व आय.बी.पी.एस या कंपन्यामार्फत ऑनलाईन पद्धतीने घेण्यास राज्य शासनाने मंजुरी दिलेली आहे .

यानुसार कामगार आयुक्त मुंबई यांच्या अधिपत्याखालील भुतपुर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील वर्ग ब व वर्ग क संवर्गातील राज्यस्तरीय व प्रादेशिक स्तरीय निवड समित्यांची स्थापना करण्यात येत असुन यामध्ये राज्यस्तरीय निवड समितीमध्ये कामगार आयुक्त कामगार आयुक्तालय मंबई हे अध्यक्ष असतील तर विभागीय निवड समितीमध्ये संबंधित विभागीतल अपर आयुक्त कामगार आयुक्त हे अध्यक्ष असतील .

सदर कामगार आयुक्त मुंबई यांच्या अधिपत्याखालील भुतपुर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ब व गट क संवर्गातील पदे भरण्यासाठी उमेदवारांची निवड करण्याची कार्यपद्धती सामान्य प्रशासन विभागाच्या संदभाधीन शासन निर्णयातील तरतुदींनुसार करण्यात येईल .

सदर पदभरती संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

पदभरती शासन निर्णय

Leave a Comment