BMC : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये महाभरती प्रक्रिया जाहीर ! Apply Now !

Spread the love

बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये सहाय्यक कर्मचारी परिचारिका पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Municipal Corporation Of Greater Mumbai Recruitment for Assistant Staff Nurse ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नाव – सहाय्यक कर्मचारी परिचारिका ( Assistant Staff Nurse ) , एकुण पदांची संख्या – 421

पात्रता –

उमेदवार हा नर्सिंग कौन्सिलने विहीत केलेला सहाय्यक परिचारिका प्रसविकेचा अभ्यासक्रम पुर्ण केलेला असावा तसेच उमेदवार हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम उच्चतम परीक्षा 50 गुणांचा प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेवून उत्तीर्ण झालेला असावा .त्याचबरोबर उमेदवार हा CCC / MSCIT संगणक हाताळणी प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

वयोमर्यादा – अर्ज सादर करावयाच्या दिनांकास म्हणजेच दि.16.01.2023 रोजील खुल्या प्रवर्गाकरीता किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे वयोमर्यादा असणे आवश्यक आहे तर मागासवर्गीय उमेदवारांकरीता 18 ते 43 वर्ष दरम्यान वयोमर्यादा असणे आवश्यक आहे

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज मुंबई पब्लिक स्कुल , जगन्नाथ भातणकर मार्ग शिरोडकर मंडईजवळ परळ मुंबई 400012 या पत्त्यावर अर्ज दि.25.01.2022 पर्यंत सादर करायचा आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकरण्यात येणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे .

जाहिरात पाहा

Leave a Comment