महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC ) मध्ये भरती !

Spread the love

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मधील कार्यरत कर्मचाऱ्यांचा सुमारे 6 महिने संप सुरु होता .या संपामध्ये कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी म्हणजे महामंडळ कर्मचाऱ्यांना राज्य शासन सेवेत सामावुन घेणे ही मागणी मान्यच झाली नाही .यासाठी न्यायालयामध्ये सुनावणी सुरुच आहेत .परंतु संपामुळे काही अंशी वेतनामध्ये वाढ झाली आहे .शिवाय कोरोना काळामध्ये बस प्रवासाला स्थगितच होता .

बस महामंडळ मध्ये मागील तीन वर्षांपासुन रिक्त पदांवर मोठ्या प्रमाणात पदे भरली नाहीत .यामुळे कामाचा मोठा ताण कर्मचाऱ्यांवर येत असल्याने , रिक्त पदांवर हळुहळु पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळच्या रायगड विभागा अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , पदांनुसार आवश्यक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहित मुदत कालावधी मध्ये अर्ज मागविण्यात येत आहेत .सदरचा पदांनुसार आवश्यक पात्रता , वेतन , अर्हता याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.अभियांत्रिकी पदवीधर01
02.यांत्रिकी मोटार गाडी24
03.वीजतंत्री ( इलेक्ट्रिशियन )05
04.पत्रे कारागीर12
05.डिझेल मेकॅनिक05
06.सांधाता02
 एकुण पदांची संख्या49

पात्रता – अभियांत्रिकी पदवी / दहावी + आयटीआय / 8 वी + आयटीआय

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.27.03.2021 रोजी 18 वर्षे ते 33 वर्षादरम्यान असणे आवश्यक . ( मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयामध्ये – 05 वर्षे सुट देण्यात येईल . )

वेतनमान – निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहा स्टायपेंट स्वरुपात – 4,984/- रुपये ते 9,535/- रुपये मानधन मिळेल .

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 08.10.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment