भारतीय रेल्वेमध्ये 10 वी पात्रताधारकांना 3,115 जागांसाठी मेगाभरती ! अर्ज प्रक्रिया सुरु .

Spread the love

भारतीय रेल्वे ही भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत असुन , भारत सरकारकडे रेल्वे सेवेची मक्तेदारी असून , रेल्वे विभागामध्ये 4 लाख पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत . भारतीय रेल्वेचे सोयीनुसार विविध विभाग करण्यात आलेले आहेत . भारतीय पुर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय कोलकत्ता येथे असुन सदर विभागामध्ये विविध पदांच्या 3115 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .

भारतीय रेल्वे विभागामध्ये 3115 जागांसाठी अप्रेंटिशिप पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , रेल्वेच्या पुर्व विभाग अंतर्गत एकुण 7 वर्कशॉप कार्यरत आहेत . वर्कशॉप व विभागनिहाय पदे भरण्यात येत आहेत .यामध्ये फिटर , वेल्डर , मेकॅनिक ,मशिनिस्ट , पेंटर , कारपेंटर , वायरमन , इलेक्ट्रीशियन , टर्नर इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .सदर पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर पदांनुसार नमुद संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

त्याचबरोबर सदर पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 15 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे . तसेच कमाल वयोमर्यादा ही 24 वर्षे आहे .निवड झालेल्या उमेदवारांना रेल्वे विभागाच्या सरकारी नियमानुसार वेतन / स्टायपेंट अदा करण्यात येईल .नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) कोलकत्ता विभागातील कार्यरत वर्कशॉप .

शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन दि.29.10.2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे .सदर पदांसाठी आवेदन शुल्क नसुन विहीत मुदतीमध्ये अर्ज सादर करावा लागणार आहे .या संदर्भातील सविस्तर जाहीरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन सविस्तर जाहीरात डाऊनलोड करु शकता .

जाहिरात पाहा

Leave a Comment