Govt job : मुंबई म्हटले की आपल्या डोळ्यासमोर एक वेगळे चित्र उभा राहते. कारण महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही आता संपूर्ण जगभर प्रसिद्ध झाली आहे. तेथील पर्यटन स्थळे, बाजारपेठ, औद्योगीकरण, आधुनिक विविधता, इत्यादी गोष्टींमुळे मुंबई आता अनेक नागरिकांची स्वप्न नगरी झाली आहे. म्हणजेच त्या ठिकाणी जाण्यास लोकांमध्ये आवड निर्माण होत आहे. आता अशाच नागरिकांसाठी म्हणजेच विद्यार्थी मित्रांसाठी एक सुवर्णसंधी आहे. मुंबई शहरामध्ये नोकरी करून तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता.
मुंबई पोर्टने स्वतः कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट च्या पदांकरिता भरती साठी अर्ज मागवले असून जे कोणी विद्यार्थी मित्र या भरतीसाठी इच्छुक असतील आणि पात्र असतील ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते विद्यार्थी मित्र मुंबई पोर्टच्या mumbaiport.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकता. अर्जाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे.
यासोबतच जे कोणी विद्यार्थी मित्र अर्ज करणार असतील ते डायरेक्ट mumbaiport.gov.in ह्या लिंक वरती क्लिक करून अर्ज करू शकतात. यासोबत या भरती बद्दल सविस्तर माहिती देखील तुम्ही लिंक द्वारे तपासू शकता. या भरतीमध्ये एकूण 50 पदे शिल्लक आहेत या 50 पदांकरिता भरती घेतली जाईल.
भरती अंतर्गत महत्त्वाच्या तारखा
जे कोणी इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करणार असतील त्यांनी या महत्त्वाच्या तारखांकडे लक्ष द्यावे. म्हणजेच अर्ज करण्याची सुरुवातीपासूनची तारीख ही 15 डिसेंबर असून अर्ज करण्याचे शेवटची तारीख हे नऊ जानेवारी आहे. या तारखेच्या दरम्यानच तुम्ही ह्या भरती करिता अर्ज करू शकता.या भरतीमध्ये एकूण रिक्त पदांची संख्या ही 50 आहे. म्हणजेच 50 रिक्त जागांकरिता ही भरती घेण्यात आली आहे.
हे विद्यार्थी या भरतीस पात्र असणार आहेत!
अर्ज करणारे विद्यार्थी कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेमधून किंवा बोर्डा मधून दहावीची परीक्षा पास केलेले असावेत. याबरोबरच नॅशनल कौन्सिल ऑफ वोकेशनल ट्रेनिंग जारी केलेल्या सीओपीए चे सर्टिफिकेट त्या विद्यार्थ्याकडे असावे.
अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा म्हणजेच जे उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होणार आहेत त्यांची वयोमर्यादा आहे 14 वर्षापासून अठरा वर्षापर्यंत असणार आहे.
- UIIC : केंद्र सरकारच्या युनायटेड इंडिया विमा कंपनी लिमिटेड मध्ये 200 रिक्त जागेसाठी मोठी पदभरती !
- IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत 344 जागेसाठी महाभरती ,लगेच करा आवेदन ..
- बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 600 जागेसाठी मोठी पदभरती ; Apply Now !
- भारतीय एविएशन सेवा मध्ये 12 वी / 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 3,508 जागांसाठी महाभरती ; Apply Now !
- NFL : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 336 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..