बँकेत FD करायचे असल्यास ,बँकेच्या या योजनेत करा गुंतवणूक ! सर्वात जास्त मिळेल फायदा !

Spread the love

बॅंकेत फिक्स्ड डिपॉजिट करायचे असेल तर 555 दिवसाच्या आतमध्ये या योजनेचा लाभ घेऊ शकता.भारतीय रिझर्व बँकेने रेपो रेट मध्ये वाढ केल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे नियोजन हे अपुरे राहीले आहे.ज्या लोकांना घरा साठी कर्ज काढले आहे त्यांना व्याजदरात आर्थिक भार सहन करावा लागत आहे. परंतु दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांनी फिक्स्ड डिपॉजिटच्या व्याजदरात वाढ केली असून इतरही नवीन योजना ठेवीदारासाठी सुरू केल्या आहे. सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेमधून फिक्स्ड डिपॉजिटवरील व्याजदरात वाढ केली आहे.

19 डिसेंबर पासून हे नवीन दर सुद्धा लागु करण्यात आले आहे.
इंडियन बँकेच्या या पॉलिसी सोबत नवीन 555 दिवसाच्या फिक्स्ड डिपॉजिटची योजना चालू करण्यात आली आहे.या 555 दिवसाच्या कायम ठेवीवर खाते दारांना 7 टक्के व्याज देण्यात येत आहे. त्यामध्ये जेष्ठ नागरिकांना 7.15 टक्के व्याजदर ठेवण्यात आले आहे.5 हजार रुपयापासून या बॅंकेत गुंतवणूक केली जाऊ शकते.

बॅंके कडून अगदी 1 महिन्या पासून ते 555 दिवसापर्यंतच्या फिक्स्ड डिपॉजिटवर व्याज देण्यात येत आहे. त्यानंतर 7 ते 29 दिवसापर्यंत मॅच्युअर होणार्‍या कायम ठेवीवर 2.80 टक्के 30 ते 45 दिवसात मॅच्युअर होणार्‍या एफडी वर 3 टक्के तर 45 ते 90 दिवसाच्या फिक्स्ड डिपॉजिटवर 3.25 टक्के व्याजदर इंडियन बँके कडून देण्यात येत आहे.91 ते 120 दिवसाच्या कायम ठेवीवर 3.5 टक्के, 121 ते 180 दिवसामध्ये मॅच्युअर होणार्‍या ठेवीवर 3.85 टक्के तसेच 180 दिवस आणि 9 महिन्याच्या कालावधीत मॅच्युअर होणार्‍या ठेवी योजनावर 4.50 टक्के व्याजदर मिळत आहे.

Leave a Comment