भारतातील राष्ट्रीयकृत्त सरकारी बँकामध्ये विविध पदांच्या तब्बल 8,611 जागांसाठी मोठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ,ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . पदांचे नाव , पदनिहाय आवश्यक पात्रता , वेतनश्रेणी , पदसंख्या या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहूयात ..
पदनाम व पदांची संख्या : यांमध्ये कार्यालय सहाय्यक पदांच्या एकुण 5538 जागा , अधिकारी स्केल ( सहाय्यक व्यवस्थापक ) पदांच्या 2485 जागा , अधिकारी स्केल – I ( कृषी अधिकारी ) पदांच्या 60 जागा , मार्केटिंग अधिकारी पदांच्या 03 जागा ट्रेझरी व्यवस्थापक पदांच्या 08 जागा अधिकारी स्केल II ( विधी ) पदांच्या 24 जागा , अधिकारी स्केल II ( सी .ए ) पदांच्या 21 जागा तर आयटी अधिकारी पदांच्या एकुण 67 जागा तर जनरल बँकिंग अधिकारी पदांच्या 332 जर सिनियर व्यवस्थापक पदांच्या 73 जागा असे एकुण 8,611 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
पात्रता : यांमध्ये अधिकारी स्केल I आणि अधिकारी स्केल II पदांसाठी उमेदवार हे कोणत्याही / संबंधित क्षेत्रातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच सदर पदांसाठी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे दि.01 जून 2023 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वयोमर्यादा 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे . यांमध्ये अनुसुचित जाती प्रवर्ग करीता पाच तर इतर मागास प्रवर्गाकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट मिळणार आहे .
अर्ज प्रक्रिया आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://ibpsonline.ibps.in/crps23may23/ या संकेतस्थळावर दि.21 जून 2023 पर्यंत अर्ज सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता General / OBC प्रवर्गातील उमेदवारांकरीता 850/- रुपये तर मागास प्रवर्गातील व माजी सैनिक उमेदवारांना 175 /- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- ESIC : कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत 558 रिक्त जागेसाठी पदभरती ,लगेच करा आवेदन !
- ग्रंथपाल , शिक्षक , लेखापाल , लिपिक ,शिपाई , चालक , सफाई कामगार इ. पदांसाठी मोठी पदभरती !