पिंपरी चिंचवड सहकारी बँकमध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीत ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pimpari Chinchwad Sahakari Bank Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 08 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
हे पण वाचा : महाराष्ट्र विद्या मंडळ ,पुणे येथे मोठी पदभरती प्रक्रिया !
01.मुख्य कार्यकारी अधिकारी पदांच्या 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता उमेदवार हा CAIB / DBF / Diploma in Co-Operative Business Management अथवा चार्टर अकौंडंट तसेच काणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी , वाणिज्य शाखेतील उमेदवारांस प्राधान्य देण्यात येईल .तसेच सदर पदांकरीता कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे .
02. शाखा व्यवस्थापक – शाखा व्यवस्थापक पदांच्या एकुण 04 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधारक असणे आवश्यक आहे तसेच शाखा व्यवस्थापक पदाचा किमान 03 ते 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे .सदर पदांकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 30 ते 50 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे .
03.आयटी व्यवस्थापक – आयटी व्यवस्थापक पदांच्या एकुण 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमदेवार हा MCS /MCA /MCM /BE पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच उमेदारांस किमान 03 ते 05 वर्षांचा सुरक्षा तसेच आयटी विभाग प्रमुख अशा पदांचा अनुभव असणे आवश्यक आहे . सदर पदांकरीता उमेदवाराचे वय 30 ते 45 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे .
हे पण वाचा : पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी ! Aaply Now !
04.कायदेशिर अधिकारी – कायदेशिर अधिकारी पदांच्या एकुण 01 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा LLB , LLM उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच उमेदवारांस सहकारी बँकेमध्ये किमान 05 ते 07 वर्षांचा संबंधित कामकाजाचा अनुभव असणे आवश्यक आहे . सदर पदांकरीता अर्ज करण्याकरीता उमेदवाराचे वय 35 वर्षे ते 55 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज [email protected] या ईमेलवर दि.27 एप्रिल 2023 पर्यंत सर्व कागतपत्रांसह सादर करायचे आहेत . सदर पदांकरीता उमदेवारांकडून कोणत्याही प्रकारेच आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..