राज्य शासन सेवेत सध्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदांचा आकडा वाढलेला आहे , सदर रिक्त पदांवर पदभरती करणेबाबत राज्य शासनांकडून मोठी मोहिम हाती घेण्यात आलेली आहे . सरळसेवा कोट्यातील पदे 100 टक्के क्षमतेने तर उर्वरित रिक्त पदांवर 80 टक्के क्षमतेने पदभरती प्रक्रिया करण्याचा मानस राज्य सरकारने केला आहे .
सध्या राज्य शासनांच्या महसूल विभागांमध्ये तब्बल 13,536 पदे रिक्त आहेत . सदर रिक्त पदांवर राज्य शासनांकडून मोठी महाभरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहेत . राज्य शासनांने जाहीर केलेली तलाठी पदभरती प्रक्रिया पुढील महिन्यांपासून प्रत्यक्ष अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे .तसेच महसूल विभागातील रिक्त पदांवर राज्य शासनांकडून पदभरती प्रक्रिया करीता समिती गठित करण्यात येणार आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र तलाठी मेगाभरतीचे नवीन नियमावली व वेळापत्रक पाहा !
राज्य शासनांच्या महसुल विभागांकडून जाहीर केलेल्या रिक्त पदांचा अहवालानुसार , सर्वाधिक रिक्त पदे हे तलाठी पदांच्या एकुण 5030 जागा रिक्त आहेत , यापैकी रिक्त पदांच्या 100 टक्के क्षमतुने पदभरती करण्यात येणार आहे .तर अपर जिल्हाधिकारी पदांचे 31 जागा , उपजिल्हाधिकारी पदांचे 16 जागा , तहसिलदार पदांच्या 66 जागा , नायब तहसिलदार पदांचे 457 जागा , अधिकक्षक पदांचे 12 जागा , उपअधिक्षक भुमी अभिलेख पदांच्या 91 जागा तर मुद्रांक निरीक्षक पदांच्या 15 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .

त्याचबरोबर दुय्यम निबंधक पदांच्या 182 जागा , मंडळ अधिकारी / अव्वल कारकून / महसूल सहाय्यक / लघुटंकलेखक पदांच्या एकुण 2575 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . तसेच अराजपत्रित लघुलेखक पदांच्या 153 जागा , कनिष्ठ लिपिक पदांच्या 532 जागा , पदसमुह 4 पदांच्या 1819 जागा तर शिपाई पदांच्या 2375 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
- BOBCAPS : कॅपिटल मार्केट्स लिमिटेड अंतर्गत 70 रिक्त जागेसाठी आत्ताची नविन पदभरती .
- रयत शिक्षण संस्था : कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक शाळा अंतर्गत शिक्षक , ग्रंथपाल , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- राज्य शासन सेवेत गड ड संवर्गातील शिपाई पदाच्या 284 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- GGMCJJH : सर जे.जे समूह रुग्णालय मुंबई अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर व शिपाई पदांसाठी पदभरती !