मेगाभरती 2023 :  महाराष्ट्र महसूल विभाग मध्ये विविध पदांच्या तब्बल 13 हजार 536 जागांसाठी महाभरती प्रक्रिया !

Spread the love

महाराष्ट्र राज्य महसुल विभागांमध्ये विविध पदांच्या तब्बल 13,536 जागांसाठी लवकरच पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून यांमध्ये वर्ग अ ते ड मधील विविध रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . या महाभरती संदर्भात राज्याच्या महसुल विभागामार्फत रिक्त पदांचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे . संवर्गनिहाय रिक्त पदांचा तपशिल , पदांचे नावे या संदर्भात सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

यामध्ये संवर्ग अ व ब मध्ये अपर जिल्हाधिकारी पदांच्या 31 जागा  , उपजिल्हाधिकारी पदांच्या 16 जागा तर तहसिलदार पदांच्या 66 जागा , नायब तहसिलदार पदांच्या 457 जागा , अधिक्षक पदांच्या 12 जागा , उपअधिक्षक भूमी अभिलेख पदांच्या 91 जागा , मुद्रांक निरीक्षक पदांच्या 15 जागा , दुय्यम निबंधक पदांच्या 182 जागा तर अराजपत्रित लघुलेखक पदांच्या 153 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .

सविस्तर पदभरती जाहिरात पाहा

तर संवर्ग क मध्ये तलाठी पदांच्या 5030 जागा , मंडळ अधिकारी , अव्वल कारकुन , महसुल सहाय्यक लघुटंकलेखक पदांच्या एकुण 2,575 जागा , तर कनिष्ठ लिपिक पदांच्या 532 जागा व पदसमूह 4 पदांच्या एकुण 1819 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .

तर संवर्ग ड मध्ये शिपाई पदांच्या एकुण 2 हजार 375 जागा रिक्त आहेत . सदरची पदे हि नियमित वेतनश्रेणीवर भरण्यात येणार नसून बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत . परंतु महसूल विभागाकडून वर्ग – 4 पदे मृत करणेबाबतचा सुधारित आकृतीबंध जाहीर न केल्याने , सदरची पदे नियमित वेतनश्रेणीवरच भरले जातील .सुधारित आकृत्तीबंधानुसार सदर पदे मृत घोषित केल्यास , सदर शिपाई हे पद बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येतील .

जाहिरात पाहा

Leave a Comment