महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ! 35,000-50,000/- एवढा मिळेल पगार !

Spread the love

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ आस्थापनेवरील विविध पदांकरीता कंत्राटी तत्वावर पदभरती करीता इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून  ऑफलाईन पद्धतीने आवेदन  मागविण्यात येत आहेत . पदांचे नावे ,आवश्यक अर्हता व पदसंख्या व वेतनमान याबाबत सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01. संचालक प्रतिष्ठापना पदांचे एकुण 01 जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा महाराष्ट्र राज्य पोलिस दलातुन निशस्त्र सहा. आयुक्त / पोलिस उप अधिक्षक या पदांवरुन सेवेतुन निवृत्त झालेले अधिकारी पात्र असतील . तसेच उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातुन कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .सदर पदांकरीता 50,000/- प्रतिमहा वेतनमान देण्यात येईल .

हे पण वाचा : महाराष्ट्र जिल्हा परिषद मध्ये 18,939 पदांसाठी मेगाभर्ती जाहीर !

02.सह संचालक – सह संचालक पदांचे एकुण 02 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेतुन पदवीधारक असणे आवश्यक आहे . नागपुर व औरंगाबाद विभागासाठी संबंधित विभागात राहत असलेले व त्या भागात पोलिस खात्यात असताना नोकरी केलेले उमेदवार यांना प्राधान्य देण्यात येईल . सदर पदांकरीता प्रतिमहा 50,000/- रुपये वेतनमान देण्यात येईल .

03.सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी – सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी पदांच्या एकुण 05 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा महाराष्ट्र राज्य पोलिस दलातून किंवा राज्य राखीव पोलिस बलातुन पोलिस निरीक्षक या पदावरुन सेवानिवृत्त झालेला असावा .सदर पदांकरीता 45,000/- प्रतिमहा वेतन देण्यात येईल .

हे पण वाचा : तलाठी पदभरतीचे सुधारीत नियम व वेळापत्रक पाहा सविस्तर !

04.सहा. पोलिस निरीक्षक / पोलिस उप निरीक्षक / सहाय्यक पोलिस उप निरीक्षक – सदर पदांच्या एकुण 20 जागेसाठी व पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा 12 वी (HSC ) अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या पोलिस दलामधून अथवा राज्य राखीव पोलिस बलातून (SRPF ) सहा. पोलिस निरीक्षक / पोलिस उप निरीक्षक / सहाय्यक पोलिस उप निरीक्षक या पदावरुन सेवानिवृत्त झालेले उमेदवार सदर पदांकरिता अर्ज करण्यास पात्र असतील .सदर पदांकरीता प्रतिमहा 35,000/- वेतनमान देण्यात येईल .

वरील नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज पोलिस महासंचालक / व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ , मुंबई सेंटर 01, 32 मजला वर्ल्ड ट्रेड सेंटर कफ परेड मुंबई 400005 दुरध्वनी 022 2215 1847 फॅक्स 022 2215 1867 या पत्त्यावर दि. 28.04.2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment