महाराष्ट्र राज्य ‍जिल्हा परिषदेमध्ये गट क संवर्गातील विविध पदांच्या 18,939 जागांसाठी  मेगाभरती ! असा करा अर्ज !

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासन सेवेत गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्‍बल 18 हजार 939 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , या संदर्भात राज्याच्या ग्रामविकास विभागांकडून दि.12 एप्रिल 2023 रोजी पदभरती प्रक्रिया नोटीफिशिकेश न जाहीर करण्यात आलेले आहेत . सदर परिपत्रकानुसार राज्य शासनांच्या जिल्हा परिषदेमध्ये गट क संवर्गातील सरळसेवा पद्धतीच्या 13 पदांच्या 18,939 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .

सदर परिपत्रकानुसार पदांनुसार आवश्यक शैक्षणिक अर्हता , पदांनुसार वेतनश्रेणी व परीक्षेचे वेळापत्रक नमुद करण्यात आलेले आहेत .

कनिष्ठ अभियंता – कनिष्ठ अभियंता पदांकरीता उमेदवार हा अभियांत्रिकी या विषयातील स्थापत्य / यांत्रिकी मध्ये पदवी / पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . सदर पदांकरीता 9300-34800/- ग्रेड वेतन 4300/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन देण्यात येईल .

कंत्राटी ग्रामसेवक – कंत्राटी ग्रामसेवक पदांसाठी उमेदवार हा इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अथवा शासन मान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका तीन वर्षांचा अभ्यासक अथवा शासन मान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी / कृषी पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .कंत्राटी ग्रामसेवकास सेवक कालावधीमध्ये 6000/- प्रतिमहा मानधन देण्यात येतील .

हे पण वाचा : या बँकेत सर्वात मोठी मेगाभर्ती ! लगेच करा अर्ज !

औषध निर्माता – औषध निर्माता या पदांकरीता उमेदवार हा औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शास्त्र अधिनियम 1948 खालील नोदणींकृत औषध निर्माते असणे आवश्यक आहे . सदर पदांकरीता वेतनबॅन्ड 5200-20200/- ग्रेड पे 2800/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन अदा करण्यात येईल .

वरिष्ठ सहाय्यक – वरिष्ठ सहाय्यक या पदांकरीता उमेदवार हा वाणिज्य शाखेत लेखाशास्त्र व लेखा परिक्षा हे विशेष विषय घेवून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .किंवा समकक्ष अर्हता धारक उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत . सदर पदांकरीता वेतनबॅन्ड 5200-20200/- ग्रेड वेतन 2400/- या वेतनश्रेणींमध्ये वेतन अदा करण्यात येईल .

आरोग्य सेवक –  आरोग्य सेवक या पदांकरीता उमेदवार हा बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्याचबरोबर उमेदवार हा बहुउद्देशिय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असणारा 12 महिन्याचा मूलभूत पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल अशा उमेदवारांनी नियुक्ती नंतर असे प्रशिक्षण पुर्ण करणे आवश्यक आहे .सदर पदांकरीता 5200-20200/- ग्रेड पे 2400/- या वेतनश्रेणींमध्ये वेतन अदा करण्यात येईल .

आरोग्य सेवक ( महीला ) – सदर पदांकरीता साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा नोंदणीसाठी जे पात्र असतील अशा महिला उमेदवार पात्र असतील . सदर पदांकरीता वेतनबॅन्ड 5200-20200/- ग्रेड पे 2400/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन अदा करण्यात येईल .

हे पण वाचा :पदवी धारकांसाठी या बँकेत तब्बल 5,000 जागेसाठी पदभरती !

अंगणवाडी पर्यवेक्षिका – अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांकरीता उमेदवार एखाद्या संविधिक विद्यापीठाची खास करुन समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंव पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .या पदांकरीता 9300-34800/- ग्रेड पे 4100/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन देण्यात येईल .

विस्तार अधिकारी ( कृषी विभाग ) – विस्तार अधिकारी या पदांकरीता उमेदवार हा कृषी विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही समतुल्य अर्हता धारण करणे आवश्यक आहे .सदर पदांकरीता 9300-34800/- ग्रेड पे 4200/- या वेतनश्रेणींमध्ये वेतन अदा करण्यात येईल .

पशुधन पर्यवेक्षक – पशुधन पर्यवेक्षक या पदांकरीता उमेदवार हा सांविधिक विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रातील पदवी धारण करणारा उमेदवार किंवा पशुसंवर्धन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार सदर पदांकरीता अर्ज करण्यास पात्र असतील .या पदांकरीता 5200-20200/- ग्रेड वेतन 2400/- या वेतनश्रेणींमध्ये वेतन अदा करण्यात येईल .

कनिष्ठ लेखाधिकारी – कनिष्ठ लेखाधिकारी या पदांकरीता उमेदवार पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सरकारी कार्यालय / व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान 05 वर्षााचा अनुभव असणे आवश्यक आहे . तसेच लेखा परिक्षण विषयास वाणिज्य शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .सदर पदांकरीता 9300-34800/- ग्रेड वेतन 4200/- या वेतनश्रेणींमध्ये वेतन अदा करण्यात येईल .

सहाय्यक अभियांत्रिकी सहाय्यक – या पदांकरीता उमदेवार हा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्षांचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार या पदांकरीता अर्ज सादर करण्यास पात्र असणार आहेत .

अशा वरिल 13 पदांच्या तब्बल 18,939 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची पदभरती परिपत्रक राज्य शासनांच्या ग्रामविकास विभागांकडून निर्गमित करण्यात आलेले आहेत . सदर पदभरती प्रक्रिया बाबतचा राज्य शासनांचे परिपत्रक डाऊनलोड करण्याकरीता खालील लिंकवर क्लिक करावे .

पदभरती शासन परिपत्रक

Leave a Comment