PGCIL : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Power Grid Corporation Of India Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 184 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : इंजिनिअर ट्रेनी यांमध्ये इलेक्ट्रिकल -144 , सिव्हिल -28 जागा , इलेक्ट्रॉनिक्स – 06 जागा , तर कॉम्प्युटर विज्ञान – 06 अशा एकुण 184 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह संबंधित विषयात B.E / B.TECH / B.SC ( Engg.) तसेच GATE 2023 परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : उमेदवाराचे दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी कमाल वयोमर्यादा ही 28 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपले आवेदन हे https://www.powergrid.in/job-opportunities या संकेतस्थळावर दिनांक 10 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायची आहे . सदर पदभरती करीता 500/- रुपये तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक / अपंग उमेदवारांकरीता परीक्षा शुल्क / फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 277 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स अंतर्गत गट क संवर्गातील विविध पदांच्या तब्बल 723 जागेसाठी महाभरती !
- प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 24 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- CIL : कोल इंडिया लिमिटेल अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 640 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !