RRB : भारतीय रेल्वे विभाग मध्ये विविध पदांच्या तब्बल 7,951 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

RRB : भारतीय रेल्वे विभाग मध्ये विविध पदांच्या तब्बल 7,951 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांकडून विहीत कालाधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Railway Recruitment Board , Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 7951 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.केमिकल सुपरवाइजर / संशोधन  17
02.मेटलर्जिकल सुपरवाइजर / संशोधन
03.कनिष्ठ अभियंता    7934
04.डेपो मटेरियल सुपरिटेंडंट
05.केमिकल व मेटलर्जिकल सहाय्यक
 एकुण पदांची संख्या7951

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :

पद क्र.01 साठी : केमिकल टेक्नॉलॉजी पदवी उत्तीर्ण

पद क्र.02 साठी : मेटलर्जिकल अभियंता पदवी

पद क्र.03 साठी : संबंधित विषय / ट्रेड मध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा

हे पण वाचा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक , शिपाई पदांसाठी मोठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

पद क्र.04 साठी : कोणत्याही विषयामधील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

पद क्र.05 साठी : 45 टक्के गुणांसह बी.एस्सी ( भौतिकशास्त्र / रसायन शास्त्र विषयांसह )

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 36 वर्षे दरम्यान आवश्यक असेल , तर SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षाची सुट तर OBC प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षाची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले ओवदन हे  https://www.rrbmumbai.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 30 जुलै 2024 पासुन ते दिनांक 29 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 500/- रुपये तर मागास / माजी सैनिक / महिला / आ.दु.घ तसेच तृतीयपंथी उमेदवारांकरीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment